इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनुष्य जीवन सुंदर आहे, कारण जगणे सुंदर आहे. त्यामुळे मृत्यू कोणालाही नको असतो. आपल्या मृत्यूचे प्रत्येकालाच भय वाटत असते. परंतु मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. मृत्यू हा आढळ आहे, कारण या जगात कोणीही अमर पट्टा घेऊन आलेली नाही. आचार्य विनोबा भावे म्हणतात की, ज्यांनी मृत्यूला जिंकले ! त्याने जग जिंकले. परंतु मृत्यू होत असताना मनुष्य नेमका काय विचार करतो ? यासंदर्भात अनेकांना उत्सुकता असते.
मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याची मानवाला नेहमीच उत्सुकता असते. चित्रपट आणि कथांमध्ये मृत्यूचे अनेक प्रकारे चित्रण केले जाते. मरताना माणसाचे संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर फ्लॅशबॅकसारखे फिरत असल्याचे अनेक चित्रपटांतून दाखवण्यात आले आहे. आता एका संशोधनातही ही बाब समोर आली आहे. फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान जर्नलमध्ये असे समोर आले आहे की, मरताना आपल्याला जीवनातील सर्व खास क्षण आठवतात. या जर्नलचे शीर्षक ‘एनहान्स्ड इंटरप्ले ऑफ न्यूरोनल कोहेरेन्स अँड कपलिंग इन द डायिंग ह्युमन ब्रेन’ असे आहे.
या संशोधनात मृत्यू झालेल्या किंवा मृत्यूला स्पर्श करून परत आलेल्या नागरिकांचा डेटा घेण्यात आला. तेव्हा हा शोध अचानक लागला. वास्तविक संशोधक 87 वर्षांच्या मिरगीच्या रुग्णाची तपासणी करत होते. त्या रुग्णाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या मेंदूचे स्कॅनिंग केले जात होते. मृत्यूपूर्वी, त्याच्या मनात काय चालले होते याची त्याला एक प्रतिमा ही लहरींच्या रूपात मिळाली, ती पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
द डेली डायजेस्टच्या वृत्तानुसार, संशोधनात असेही आढळून आले की जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हृदय थांबते तर मेंदू ३० सेकंद चालू राहतो. यापूर्वी असे संशोधन मानव सोडून इतर प्रजातींवर झाले आहे. मानवाच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर लगेचच लहरींची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ होती. उंदरांवर केलेल्या प्रयोगातून असेही दिसून आले आहे की, जेव्हा त्यांचे हृदय थांबते, त्यानंतर ३० सेकंदांपर्यंत मेंदूमध्ये प्रचंड क्रिया होते. या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला की, मरताना, आपल्या मेंदूमध्ये भूतकाळाची आठवण ठेवताना गॅमा वेव्ह सारखी क्रिया होत असते.