अटलांटा – आधुनिक युगात स्त्री पुरुष समानता असून जगभरात सर्वच देशात कुठलाही लिंगभेद मानणे योग्य असल्याचे म्हटले जाते. तसेच आजच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला-खांदा लावून स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात काम करत असल्याचे दिसून येते. परंतु अद्यापही स्त्रियांना त्यांच्या कामाचे श्रेय योग्य प्रकारे दिले जात नसल्याचे दिसून येते. अगदी अमेरिकेसारख्या देशात संशोधनाच्या क्षेत्रात देखील असेच आढळून आले आहे.
एका अलीकडील अभ्यासानुसार, असे दिसून आले की, महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा शैक्षणिक आणि संशोधन कार्याचे श्रेय कमी मिळते. संशोधन लेखक म्हणून प्रथम कोणाचे नाव प्रकाशित केले जात आहे, याबद्दल पुरुषांपेक्षा स्त्रिया सहमत नसतात. तसेच नैसर्गिक विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात स्त्रिया त्यांच्या समवयस्कांपेक्षा अधिक मतभेद नोंदवतात. तथापि, यामुळे त्यांच्यासाठी भविष्यातील संधी देखील कमी होतात.
‘द जेंडर नेचर ऑफ ऑथरशिप’ या अभ्यासातील निष्कर्ष तथा निकाल सायन्स अॅडव्हान्स रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. यात जॉर्जिया टेक येथील पेपरचे सह-लेखक, प्राध्यापक काशिदी सुगिमोटो यांनी लिंग- भेद आधारित असहमतीच्या संदर्भात घेण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी परीक्षा असल्याचे म्हटले आहे. या सर्वेक्षणात सहभागी ५,५७५ व्यक्तींच्या प्रतिसादांवर या संशोधनाचे निकाल ठरवले गेले आहेत.
शैक्षणिक प्रकाशनांमध्ये ज्या क्रमाने नावे दिसतात ती उत्पादकता आणि प्रतिष्ठेशी संबंधित असतात. या क्रमवारीत नाव पहिले असणारे बऱ्याचदा कनिष्ठ संशोधक, हे पुरूष असतात, प्रत्यक्षात संशोधन स्त्री करत असतात, तसेच अनेकदा श्रेय वाटपात पूर्ण श्रेय पुरुष घेतात. तसेच स्त्रिया आणि पुरुष लेखनाचे श्रेय वेगळे ठरवतात. संशोधनात स्त्रियांना सुरुवातीला कोणतीही गोष्ट स्पष्ट करणे आवडते, पुरुषांना मात्र नंतर चर्चा करणे आवडते. त्यामुळे महिलांना भविष्यातील कमी संधी मिळतात, असे दिसून येते.