तेल अवीव (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – पालकांच्या स्मार्टफोनच्या अतिवापराचा परिणाम त्यांच्यापेक्षा त्यांच्या लहान मुलांवर अधिक होतो. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे केवळ आई आणि बालक यांच्यातील संवादावरच परिणाम होत नाही तर मुलाच्या विकासावरही विपरित परिणाम होतो, असे चाइल्ड डेव्हलपमेंट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
तेल अवीव विद्यापीठातील शॅलर फॅकल्टी ऑफ मेडिसिनच्या डॉ. केटी बोरोडकिन आणि स्टॅनले स्टीयर स्कूल ऑफ हेल्थ प्रोफेशन्समधील कम्युनिकेशन डिसऑर्डर विभाग यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले. दोन ते तीन वर्षांच्या मुलांच्या सुमारे १० ते १५ मातांना मुलांमधील आणि मातांमधील संबंध शोधण्यासाठी अभ्यासात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी प्रयोगात त्यांना तीन गोष्टी करण्यास सांगितले होते.
1 ) प्रथम… फेसबुक पेजवर व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याला लाईक करण्यास सांगितले.
2 ) दुसरी… मासिके आणि लेख आवडीनुसार वाचायला दिले.
3 ) तिसरा…शेवटी त्यांना त्यांच्या संबंधित मुलांसोबत खेळण्यास सांगण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे ना स्मार्टफोन होता ना कुठले मासिक होते.
डॉ. केटी सांगतात की, आई जेव्हा मुलाची काळजी घेत असते आणि त्याच वेळी स्मार्टफोन वापरत असते तेव्हा आई आणि मूल यांच्यामध्ये नेमके काय चालले आहे हे शोधण्याचा या संशोधनातून प्रयत्न करण्यात आला.
त्यावेळी त्यांना या प्रयोगाची माहिती नसल्याने काही मातांनी त्यांच्या आवडीनुसार मुलांसोबत वेळ घालवला, काहींनी स्मार्टफोन चालवले तर काहींनी मासिके वाचली. आई-मुलाच्या संवादाचे व्हिडिओ टेप केले गेले आणि नंतर रेकॉर्डिंग केले गेले.
डॉ. केटी सांगतात की, आई-मुलातील परस्परसंवाद तपासताना तीन घटक दिसून आले.
1 ) प्रथम… बाळासोबत खेळणे, मासिके वाचणे या प्रयोगात आई तिच्या मुलाशी दोन-चतुर्थांश कमी बोलत असते.
2 ) दुसरे… स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवल्यामुळे, आई आपल्या मुलाशी चारपट कमी बोलते.
3 ) तिसरे… फेसबुक ब्राउझ करताना आईने मुलाच्या एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली तर तिच्या प्रतिसादाची गुणवत्ता योग्य नसते.