मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मानवी रक्तामध्ये प्लॅस्टिकचे कण असल्याचा एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा निष्कर्ष नव्या संशोधनातून काढण्यात आला आहे. या संशोधनात परीक्षण करण्यात आलेल्या ७७ टक्के नागरिकांच्या रक्तप्रवाहात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण होते. डच संशोधकांतर्फे करण्यात आलेल्या या संशोधनात पॉलिइथिलीन टेरेफ्थेलेट (पीईटी) हे प्लॅस्टिकचे रूप माणसाच्या रक्तात सर्वाधिक प्रचलित रूप होते.
पीईटीचा वापर सामान्यपणे पाणी, जेवण आणि कपड्यांच्या पॅकेजिंगसाठी केला जातो. या संशोधनात तपासणी करण्यात आलेल्या ५० टक्के नागरिकांच्या रक्तात पॉलिइथाइलीन टेरेफ्थेलेट आढळले. तर, तपासणी करण्यात आलेल्या ३६ टक्के नागरिकांच्या रक्तात पॉलिइस्टाइनिन आढळले. द इंडिपेंडेंट या ब्रिटिश दैनिकाच्या वृत्तानुसार, हवेसोबत प्लॅस्टिकचे कण खाण्या-पिण्याच्या माध्यमातून मानवाच्या शरिरात प्रवेश करू शकतात, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
या संशोधनाचे निष्कर्ष खूपच धोकादायक आहेत. माणूस नकळतपणे किती प्लॅस्टिक गिळतो. हे कण रक्ताच्या प्रवाहात मिळू शकतात, अशी माहिती निष्कर्षात उघड झाली आहे. व्रिजे युनिवर्सिटीट एम्स्टर्डममध्ये इकोटॉक्सिकोलॉजी आणि पाणी गुणवत्ता आणि आरोग्याचे प्राध्यापक डिक वेथॉक सांगतात, की शरीरात या प्लॅस्टिकच्या कणांमुळे शरीरातील जुनी सूज पुन्हा येऊ शकते.
पॉलिप्रोपाइलीन, पॉलिस्टाइनिन, पॉलिमेथाइल मेथॅक्रिलेट, पॉलिइथाइलीन आणि पॉलिइथाइलीन टेरेफ्थेलेट (पीईटी) या पाच प्रकारच्या परीक्षणांसाठी २२ नागरिकांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले होते. २२ पैकी १७ जणांच्या रक्तामध्ये प्लॅस्टिक कणांमध्ये परिमाणवाचक वस्तूमान असते. या निष्कर्षामुळे संशोधक चांगलेच चक्रावले आहेत.
पीईटीनंतर मानवाच्या रक्तामध्ये पॉलिस्टाइनिन दुसरे सर्वाधिक आढळणारे प्लॅस्टिक होते. या प्रकारचे प्लॅस्टिकचा घरगुती उत्पादनांची विविधता बनविण्यासाठी व्यापक वापर केला जातो. मानवी रक्तात सर्वाधिक आढळणाऱ्या तिसऱ्या प्लॅस्टिकच्या प्रकारात पॉलिइथालीन या प्लॅस्टिकचा समावेश होतो. या प्लॅस्टिकचा वापर वाहक बॅग बनवण्यासाठी केला जातो.