मुंबई – घरांची खरेदी विक्री बाबत करण्यात आलेल्या महारेरा कायद्यात आता बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार, यापुढे कुठल्याही विकासकाला एक फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक करता येणार नाही. कायद्यातच बदल केल्याने कायद्याच्या चौकटीत आता विकासकांना राहावे लागणार आहे. यासंबंधीची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1380473223020568580