विशेष प्रतिनिधी, मुंबई
स्पर्धेच्या काळात प्रत्येक कंपनी आपले नवे उत्पादन लाँच करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मग ती वाहने असोत, मोबाईल असोत किंवा कोणतेही इक्ट्रॉनिक डिव्हाइस असो. अशा उत्पादनांना ग्राहक किती स्वीकारतात यावरून त्याची पसंती नापसंती कळते. वाहनांमध्ये पाहायचे झाले तर फ्रांसच्या रेनॉल्ट (Renault) या वाहन तयार करणार्या कंपनींच्या सिस्ट ब्रँड Dacia ने नुकतेत अपडेटेड Duster एसयूव्हीला लाँच केले आहे. या एसयूव्हीचे काही फोटो समोर आले आहेत. त्याच्या एक्सटिरिअरपासून इंटिरिअरपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.
नव्या Dacia Duster मध्ये एलइडी टर्न सिग्नलसह शार्प हँडलँप्स, नवे अलॉय चाक आणि रियर बंपर पाहायला मिळाले आहे. त्याशिवाय एसयूव्हीच्या आतील भागात नवे ग्राफिक्स आणि ऑपरेटिंग सिस्टिमनेयुक्त ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम लावण्यात आला आहे. इतर फिचरमध्ये मीडिया डिस्प्ले सिस्टिम, रेडिओ, ब्लूटूथ. दोन यूएसबी पोर्ट, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी. वॉयस रिकग्निशन आदी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
एसयूव्हीच्या आतील भागात नव्या सीटसह नव्या डिझाइनचे सेंटर कंसोल देण्यात आले आहे. यामध्ये वायरलेस स्मार्टफोन मिररिंग तंत्रज्ञानाने युक्त असे अॅडव्हान्स मीडिया नेव्हीगेशन सिस्टिमसुद्धा आहे. Dacia च्या डिजिटल इनस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये ३.५ इंचाची स्क्रिन, क्रूझ कंट्रोल, अॅटोमॅटिक लाइट्ससह इतर अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त यूएसबी सॉकेट आणि आर्मरेस्टच्या खाली स्टोरेज देण्यात आले आहे.
या एसयूव्हीमध्ये सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत मल्टिव्ह्यू कॅमेरा, पार्किंग सेंसर आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टिमसारखे फिचरही देण्यात आले आहे. युरोपमध्ये Dacia Duster ही एसयूव्ही सर्वात स्वस्त उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिची सुरुवातीची किंमत जवळपास £12,500 म्हणजेच १२.८७ लाख रुपये आहे. फेसलिफ्ट मॉडेलच्या किमतीत कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. कंपनीकडून तीन पेट्रोल वाहने, एक डिझेल आणि एक जीवाश्म इंधन इंजिनासह सादर करण्यात आली आहेत.