नवी दिल्ली – देशातील कोरोना स्थिती आणि रेमडेसिव्हिर इंडेक्शनचा पुरवठ्याचा निर्माण झालेल्या प्रश्न सोडविण्यासाठी अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसिव्हिरची निर्यात पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे केंद्राने जाहिर केले आहे. यामुळे रेमडेसिव्हिरचा देशांतर्गत पुरवठा वाढणार असून अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन पूर्णतः कोसळले आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजारही सुरू झाला आहे. तर, कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मागणीत कित्येक पटीने वाढ झाली आहे. याची दखल घेतच निर्यात बंदीचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/ANI/status/1381212800672878596