पुणे – कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे शहर पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. त्यात एक नर्स आणि तिचा सहायक यांचा समावेश आहे. हे दोघेही अवैधरित्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री करीत होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Maharashtra: Pune City Police have arrested a nurse and her associate for illegal sale of Remdesivir injection Nurse arrested, case registered at Bharti Vidyapeeth Police Station
— ANI (@ANI) April 11, 2021