नाशिक – आदिवासी विकास विभागाच्या वतीने कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव व चांदवड या सात तालुक्यातील कोरोना मुळे बाधित झालेल्या अनुसूचित जमातीच्या रूग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे, अशी माहिती कळवण एकात्मिक विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार,अनुसूचित जमातीचे कोरोना बाधित जे रुग्ण खाजगी रूग्णालयात दाखल झाले होते किंवा सद्य परिस्थितीत उपचार घेत आहेत. अशा रूग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शनकरीता येणाऱ्या खर्चासाठी मदत देण्यात येणार आहे. या करीता रूग्णांच्या नातेवाईकांनी १५ जुलै ते ३० ऑगस्ट २०२१ या कालावधीत प्रकल्प कार्यालय कळवण येथे सर्व कागदपत्र व बिलांसोबत प्रत्यक्ष उपस्थित रहावे. असेही प्रकल्प अधिकारी श्री. मीना यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.