रांची (झारखंड ) : देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत असताना झारखंड राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची प्रचंड कमतरता जाणवत आहे. त्यामुळे गंभीर रूग्णांच्या उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहे. सरकार आणि आरोग्य विभागाच्या कडक देखरेखीखाली रुग्णांच्या नावे हे इंजेक्शन दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. पण, वास्तव अगदी उलट असून रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याने मंत्री आणि आयपीएस अधिकारी गोत्यात आले आहेत.
काळ्या बाजारातून अंदाधुंदपणे खुल्या बाजारात इंजेक्शन दिले जात आहे. रांची पोलिसांनी या संपूर्ण गैरकारभारामध्ये सामील झालेल्या लोकांला पकडले असून ते राज्यातील काही मंत्री आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या अगदी जवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. राजीव कुमार सिंह असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की हा व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात गुंतला होता. तसेच बरीच मोठी नावे या रॅकेटमध्ये येऊ शकतात. सध्या या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. सदर इंजेक्शन राजीवकुमारपर्यंत कसे पोहोचले याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.
इंजेक्शन्सच्या विक्रीत सामील असलेला राजीव कुमार समाजसेवेची पोशाख धारण करून औषधांचे काळेबाजार करीत होता. त्याने स्वत: ला लोकांचा मदतनीस असल्याचा दावा केला. त्याने आपल्या कारचे नाव मिनी हॉस्पिटल ठेवले. या कारमध्ये ऑक्सिजन, पीपीई, किट्स, ग्लोव्हज, फेस शील्ड, मास्क आणि इतर अनेक वस्तूंनी भरलेल्या होत्या. संबंधित गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी पोलिस ठाण्यात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात आहे.