नवी दिल्ली – एका भामट्याने बनावट आधार कार्ड दाखवून तरूण मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर केले. तसेच तिने विरोध केला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर त्या मुलीशी लग्न करण्यासाठी आपण हिंदू असल्याचे भासवणाऱ्या या भामट्याला दिल्ली न्यायालयाने जामीन नाकारला आहे. त्याचप्रमाणे बनावट आधार कार्ड देशाला धोका असल्याचे सांगत न्यायालयाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यास पोलिस आयुक्तांना सांगितले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, तक्रारदार मुलीला फसवून आरोपीने तिच्याशी बळजबरीने एका मंदिरात लग्न केले. त्यानंतर तिच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठीच्या खोट्या कारणासाठी दबावाखाली इस्लामिक विधीनुसार पुन्हा लग्न केले. तसेच त्याने तयार केलेल्या कागदपत्रांमधून हे स्पष्ट आहे की, आरोपींनी बनावट आधार कार्डद्वारे दुसऱ्या एका महिलेशी देखील लग्न केले असून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
न्यायालयाने पुढे म्हटले की, आरोपीला जामीन मिळाला तर तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, तसेच पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. त्यामुळे या प्रकरणी संबंधित पोलिसांच्या युनिटद्वारे तपास पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे सदर आरोपीकडून बनावट आधार कार्ड तयार करण्याचे गैरप्रकार झाले आहेत आणि अशा कार्यात व्यक्तींची व्यापक आणि सुसज्ज टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
बनावट आधार कार्डमुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर परिणाम होऊ शकतात कारण नागरिकत्वाचा पुरावा म्हणून वापरला जाणारा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
परंतु महिले बरोबर एका मंदिरात लग्न केले तेव्हा आरोपीने दिलेल्या आधार कार्डमध्ये त्याचे नाव राहुल असे दाखवले होते. मात्र नंतर त्यांच्या मुलीच्या जन्माच्या वेळी त्याचे खरे नाव नूरन आहे, असे उघड झाले. मात्र सामाजिक उपहासाच्या भीतीने पिडीतेने कोणतीही कायदेशीर दिली नाही त्याचा आरोपींनी फायदा घेतला. यानंतर त्याने तिला त्रास देणे सुरू केले आणि तिने विरोध केला तर तिला ठार मारण्याची धमकी दिली.