लखनऊ – गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात सक्तीने धर्मांतर घडवून आणण्याच्या गैरप्रकाराची वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश मधील एटीएसच्या चौकशी दरम्यान हे प्रकरण उघड झाले असून या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
एटीएसच्या तपासणीत धर्मांतराच्या बाबतीत अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. कानपूरमधील आठ जण मोहम्मद उमर गौतम आणि त्यांची संस्था इस्लामिक दावा सेंटर (आयडीसी) च्या संपर्कात आहेत. ते कट्टरपंथी आहेत, त्यांच्यात एक किंवा दोन मौलवी आहेत. सदर लोक कानपूरच्या आसपास गावात उमरच्या सभांमध्ये भाग घ्यायचे आणि गर्दी जमवायचे आणि सक्तीने धर्मांतर घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. गुन्हे शाखेनेही आपल्या पातळीवरून माहिती गोळा करण्यास सुरवात केली असून प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे.
यात सर्व प्रथम आयडीसीचे उमर गौतम आणि जहांगीर यांना अटक करण्यात आली. त्यांना रिमांडवर घेतल्यानंतर हे दोघेही एकामागून एक रहस्ये उघडकीस आणत आहेत. यावर आधारित एटीएसने आता त्यांच्याशी संबंधित लोकांची यादी तयार केली आहे. यात कानपूरच्या आठ लोकांची नावेही समाविष्ट आहेत. सदर यादी कानपूर पोलिसांना देण्यात आली आहे. हे लोक बिगर मुस्लिमांना धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त करतात. त्यासाठी आमिष दाखवून सभांना बोलावून घेतात. यानंतर, त्यांना धर्मांतर करण्यास प्रेरित करतात.
दरम्यान, या गंभीर प्रकरणी गुन्हे शाखेने सर्व एक-एक करुन पडताळणी केली आहे. तसेच एटीएसचे अधिकारीही चौकशी करत आहेत. या सर्व मोबाईल नंबरची यादी पाहिली जात आहेत. तसेच हे सर्व लोक कोणाशी संपर्कात होते याचा शोध घेतला जात आहे. याबाबत धर्मांतर झालेल्या आदित्य गुप्ताने खुलासा केला आहे की, नऊ वर्षांपूर्वी, चमनगंज येथील रहिवासी मोहम्मद वसीफ नावाच्या व्यक्तीने त्याला हलीम मुस्लिम महाविद्यालयातील सभांमध्ये आणले होते.