बागपत (हरियाणा) – एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्यासाठी धर्मांतर करणे यामध्ये काही गैर नाही. परंतु एखादवेळी सक्तीचे धर्मांतर होत असेल. तर निश्चितच बेकायदेशीर आणि समाज विघातक बाब असते. हरियाणामध्ये असाच एक प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बागपतच्या खेकरा भागातील अहमदनगर-नांगलाबरी गावात दलित समाजातील १५ हून अधिक नागरिकांची फसवणूक करून धर्मांतर करण्यात आले. चार वर्षांनंतर त्यांना याची माहिती मिळाली. आता त्यांची नावे लेबर कार्डवर मुस्लिम म्हणून दिसली. याची माहिती मिळताच हिंदू जागरण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त करत पोलिस प्रशासनाकडे आरोपींवर कारवाईची मागणी केली.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अहमदनगर नांगलाबरी गावात दलित समाजातील मनोज, पप्पू आणि ज्योती नावाच्या व्यक्ती राहतात. सुमारे चार वर्षांपूर्वी गावातील मुस्लिम समाजातील काही जण त्यांच्या घरी पोहोचले होते, असा आरोप आहे. शासनाकडून कर्ज मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. मिळालेले कर्जाचे पैसे परत करावे लागणार नाहीत, असे सांगितले. यानंतर ते त्याच्या जाळ्यात सापडले आणि फॉर्म भरण्यास तयार झाले. त्यानंतर आरोपींनी आधार कार्ड बनवण्याचे मशिन त्यांच्या घरी पाठवले आणि त्यानंतर मशीनवर त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन प्रतिज्ञापत्रही घेतले. आता या सर्वांचे लेबर कार्ड निघाले असता त्यांची नावे मुस्लिम असल्याचे आढळून आले. हा प्रकार समजताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, हिंदू जागरण मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहमदनगर नांगलाब्री गावात पोहोचले. तेथे त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या प्रकरणाची सत्यता जाणून घेतली.
आर्य समाजाचे माजी प्रमुख आणि हिंदू जागरण मंचचे अधिकारी राकेश आर्य यांनी सांगितले की, याचे एक मोठे नेटवर्क असून त्याचे कनेक्शन मेरठला जोडलेले आहे. दुसरीकडे दलित समाजातील नागरिकांही पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे. मात्र धर्मांतराची चर्चा निराधार असल्याचे पोलीसा ठाण्याचे प्रभारी खेकरा देवेश शर्मा यांचे म्हणणे आहे.परंतु लेबर कार्डमधील नाव बदलण्याची बाब समोर आली आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.