मुंबई – निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बँकेत जमा असलेली रक्कम थेट सरकार जमा करण्याचा फतवा अखेर रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात लेखा व कोषागरे संचालनालयाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे नागपूर कार्यालयाने काढलेले परिपत्रक रद्द झाले आहे. जूनच्या त्या परिपत्रकामुळे निवृत्तीवेतनधारकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चिंतेचे वातावरण तयार झाले होते. यापुढे बँकेतील रक्कम सरकार जमा होणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. संचालनालयाने काढलेले आदेश खालीलप्रमाणे