मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हस्तकला तसेच अन्य कापडावरील कलाकृतींना मोठी परंपरा लाभली आहे. या कलाकृतींच्या संदर्भात किंवा देशातच नाहीत परदेशात देखील मोठी मागणी असते. मात्र योग्य बाजारपेठ किंवा व्यासपीठ उपलब्ध नसल्याने त्याचा फारसा प्रचार आणि प्रसार होत नाही, असे दिसून येते. त्यामुळेच आता रिलायन्स रिटेल कंपनीने हस्तकला कापड आणि अन्य भारतीय पारंपारिक कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
रिलायन्स रिटेल ‘स्वदेश योजना ‘ लाँच करणार आहे, हे एक खास स्टोअर असून केवळ कारागिरांना समर्पित आहे. या संदर्भात कंपनीने सांगितले की, स्टोअरमध्ये कृषी आणि खाद्य उत्पादने, हातमाग, कपडे, कापड, हस्तकला आणि हस्तनिर्मित नैसर्गिक उत्पादने विक्रीसाठी ठेवली जातील.
रिलायन्स रिटेलने एका निवेदनात म्हटले आहे की, स्टोअर भारतातील हस्तनिर्मित कार्यक्रमाला प्रोत्साहन देईल आणि कारागिरांनी बनवलेल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. पहिले स्वदेश स्टोअर 2022 च्या उत्तरार्धात उघडण्याची अपेक्षा आहे.
Reliance Retail Ventures Limited (RRVL) ची उपकंपनी, स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारांसोबत भागीदारी देखील शोधत आहे. या क्रमाने, कंपनीने कोलकाता येथील बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
याबाबत संचालिका, RRVLच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या की, भारतीय कला आणि हस्तकलेचे भविष्य एका रोमांचक वळणावर आहे. रिलायन्स रिटेल विविध स्थानिक कलाकृतींना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात मदत करण्यासाठी विविध सरकारी संस्थांसोबत भागीदारी करत आहे.