मुंबई – सर्वसामान्य जनतेमध्ये बॉलिवुडमधील सेलिब्रिटी असो की, प्रसिद्ध उद्योगपती यांच्या विषयी नेहमीच आकर्षण असते. हे नामवंत नेमके काय करतात त्यांची किती संपत्ती आहे ? त्यांनी कोठे घर खरेदी केले ? आणखीन काय प्रॉपर्टी जमविली ? याची नेहमी चर्चा होत असते तसेच सर्वसामान्य जनतेला याबाबत कायमच उत्सुकता असते मग ते बिग बी अमिताभ बच्चन असो की, रिलायन्सचे सर्वेसर्वा अनिल अंबानी असो, यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना जाणून माहिती जाणून घ्यायचे असते. त्यातून मग अफवा देखील निर्माण होतात.
सध्या मुकेश अंबानी यांच्या मुंबई सोडून लंडनमध्ये राहण्याच्या अफवा उठल्या आहेत, मात्र याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सांगितले की, अंबानी यांची लंडन किंवा जगात कोठेही स्थायिक होण्याची किंवा राहण्याची सध्या कोणतीही योजना नाही. तसेच कंपनीने अंबानी कुटुंबाने बकिंगहॅमशायरच्या स्टोक पार्क परिसरात 300 एकरच्या कंट्री क्लबला त्यांचे मुख्य घर बनवल्याच्या वृत्ताला खोटे आणि निराधार म्हटले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे स्पष्ट केले की, कंपनी अध्यक्ष अनिल अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाची लंडन किंवा जगात कोठेही स्थायिक होण्याची किंवा राहण्याची कोणतीही योजना नाही, अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या परदेश प्रवासाशी याचा संबंध जोडला जात आहे. लंडनमधील मालमत्ता खरेदी केल्यानंतर स्टोक पार्क इस्टेटला त्यांचे दुसरे घर बनवण्याची चर्चा निराधार आहे. कारण सध्या मुंबईत अल्टामाऊंट रोडवर अत्यंत अलीशान अशा ‘अँटिलिया’ या बंगल्यात ते राहत आहेत.
एका निवेदनानुसार, “RIIHL, RIL समुह कंपनीने अलीकडेच इंग्लडमध्ये Stoke Park Estate चे अधिग्रहण केले आहे, परंतु या ‘वारसा’ मालमत्तेच्या संपादनाचा उद्देश व नियोजन वेगळे आहे. तसेच त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि स्थानिक नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले आहे. एक प्रमुख गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट तेथे होण्याची शक्यता आहे. तथापि, अंबानींच्या वारंवार परदेश दौर्यांवर त्यांनी भाष्य केले नाही.