”ट्री अँड सर्पंट” भारतात 21 जुलैपासून सुरुवातीच्या बौद्ध कालखंडावर प्रदर्शन
पूर्वावलोकन कार्यक्रमाला अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू आणि भारतातील यूएस राजदूत एरिक गार्सेटी उपस्थित होते
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांच्या मदतीने अमेरिकेतील प्रतिष्ठित मेट म्युझियम भारतीय इतिहासावरील प्रदर्शन भरवणार आहे. ‘ट्री अँड सर्पंट’ नावाचे हे प्रदर्शन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. भारतातील सुरुवातीच्या बौद्ध काळापासून ते 600 वर्षांचा प्रेक्षणीय प्रवास या प्रदर्शनात दाखवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ख्रिस्तपूर्व २०० वर्षे ते ख्रिस्तानंतर ४०० वर्षे भारतीय बौद्ध इतिहासाचा समावेश असेल.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मदतीने आयोजित ‘ट्री अँड सर्पंट’ प्रदर्शनाचा विशेष पूर्वावलोकन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नीता अंबानी व्यतिरिक्त, कला आणि इतर अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली, ज्यात अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू, अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी आणि ‘ट्री अँड सर्पंट; क्युरेटर, जॉन गोये यांचा समावेश होता.
याविषयी आनंद व्यक्त करताना नीता अंबानी म्हणाल्या, “मी भारतातील बुद्धाच्या भूमीतून आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेट ची भागीदारी पुढे नेण्याचा आणि ‘ट्री अँड सर्पंट’ हे प्रदर्शन मांडताना मला अभिमान वाटतो. या प्रदर्शनात 600 वर्षांच्या सुरुवातीच्या बौद्ध काळातील 125 हून अधिक कलाकृती पाहता येतील. बुद्धाच्या विचाराचा आणि भारतीय संस्कृतीचा खोलवर संबंध आहे. बुद्धाचे विचार आजवर जगावर प्रभाव टाकत आहेत. भारतीय संस्कृतीचे गुण जगासमोर नेण्याचा आणि जगातील सर्वोत्तम गोष्टी भारतात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
नीता अंबानी या प्रतिष्ठित ‘द मेट’ संग्रहालयाच्या पहिल्या भारतीय विश्वस्त आहेत. 2019 मध्ये त्यांना मेटचे मानद विश्वस्त बनवण्यात आले. तेव्हापासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रीमती अंबानी भारताची गौरवशाली कला परंपरा जगासमोर मांडत आहेत.
द आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील ‘गेट्स ऑफ द लॉर्ड: द ट्रॅडिशन ऑफ कृष्णा’ या चित्रांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे असो किंवा ‘द मेट’ येथील भारतीय कला प्रदर्शनांना मदत करणे असो भारतीय कला आणि संस्कृतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक प्रेक्षकांना ओळख करून देण्यासाठी रिलायन्स सातत्याने प्रयत्न करत असते. भारतीय कला आणि संस्कृतीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्सने नुकतेच ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ देशाला समर्पित केले आहे. ज्यामध्ये दररोज 5 ते 6 हजार पर्यटक विविध कला आणि कलाकारांचे कौशल्य पाहण्यासाठी येत आहेत.