मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोठ्या कुटुंबांमधील छोट्या-मोठ्या घटना सुद्धा सर्वसामान्यांसाठी चर्चेच्या असतात. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरून तर एक अत्यंत गोड बातमी आली आहे. प्रसिद्ध उद्योजक मुकेश व नीता अंबानी पुन्हा एकदा आजोबा आजी झालेले आहेत. आणि ही संधी त्यांना आकाश आणि श्लोका यांनी दिली आहे.
मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा आकाश याला बघितले नाही, असा कुणीही नाही. पूर्वी तर तो एवढा लोकप्रिय नव्हता. मात्र नंतर त्याने वजन कमी केले आणि मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत तो पूर्णवेळ मैदानावर राहू लागला, तेव्हा मात्र त्याची लोकप्रियता वाढली. आकाश आणि श्लोका यांना एक मुलगा असून त्याचे नाव पृथ्वी आहे.
पृथ्वीचा जन्म २०२१ मध्ये झाला होता. आता दोनच वर्षांत दोघांनी पुन्हा एकदा गोड बातमी दिली. काही महिन्यांपूर्वी श्लोकाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून प्रेगनंट असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते. आणि ३१ मे रोजी श्लोकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे मुकेश व नीता अंबानी पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले आहेत.
डोहाळ जेवण
आकाश आणि श्लोका पुन्हा एकदा आई-बाबा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशात पोहोचली. सोशल मिडियावरून याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. काही दिवसांपूर्वीच श्लोकाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. श्लोका अंबानीचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते.
Reliance Mukesh Akash Shloka Ambani Daughter