मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगभरात व्हॅलेंटाईन डे जल्लोषात साजरा केला जात आहे. तरुणाईचा आनंद अगदी ओसंडून वाहतो आहे. या पर्वावर रिलायन्स जिओनेसुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घोषित केल्या आहेत. प्लान्सनुसार वेगवेगळ्या ऑफर देऊ केल्या आहेत. त्यात अतिरिक्त इंटरनेटसह अगदी मॅकडोनाल्डमध्ये मोफत जेणाचा आस्वासदी घेता येऊ शकणार आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्हालाही आजचा दिवस खास करता येणार आहे.
२९९९ रुपयांच्या प्लॅनसह दररोज २.५ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि ३६५ दिवसांच्या वैधतेसह दररोज १०० SMS मिळतात. व्हॅलेंटाईन डे ऑफर अंतर्गत, हा प्लॅन तुम्हाला २३ दिवसांची अतिरिक्त वैधता, ७५ जीबी अतिरिक्त डेटा, मॅकडोनाल्ड्मध्ये जेवण, १२ जीबी अतिरिक्त डेटा आणि फ्लाइट बुकिंगवर ७५० रुपये सूट मिळत आहे.
काय आहे ऑफर?
जिओ यूझरला अतिरिक्त व्हॅलिडीटी, ७५ जीबी हाय-स्पीड डेटा, १२ जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल, तसेच १९९ रुपयांच्या खरेदीवर १०५ रुपये किमतीचा मॅकडोनाल्ड आलू टिक्की किंवा चिकन कबाब बर्गर मोफत मिळवता येणार आहे. याशिवाय इझी गोकडून ४५०० रुपये किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर पेटल्स फ्लॅट ७५० रुपयांची सूट मिळणार आहे.
३४९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनसह, २.५ जीबी हाय-स्पीड, अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दररोज दिले जातात. हा प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह येतो, या प्लॅनसह यूझरना इतर फायद्यांसह १२जीबी अतिरिक्त डेटा मिळेल.
८९९ रुपयांचा प्लॅन
८९९ रुपयांच्या जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनीकडून २.५ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्येही कंपनी यूझर्सना इतर फायद्यांसह १२ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल.
Reliance Jio Valentine Day Bumper Offer