पुणे – भारतात गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याने टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे तर प्रीपेड प्लॅनची जणू काही लांबलचक यादीच आहे. सध्या मोबाईल वापरकर्ता यांना रिचार्ज योजनांमध्ये कोणती योजना खरेदी करावी, तसेच त्यांच्यासाठी कोणती योजना जास्तीत जास्त फायदेशीर देखील आहे. याबाबत संभ्रम निर्माण होतो. परंतु ज्यांना जास्त पैसे खर्च करायचे नाहीत, त्यांच्यासाठी जिओच्या स्वस्त योजना आहेत. रिलायन्स जिओची अशी एक योजना असून ज्याची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये स्वस्त डेटा आणि कॉल दिले जातात. तसेच जिओकडे आणखी अशा काही योजना आहेत ज्याची किंमत फक्त 100 रुपयांपेक्षा थोडी जास्त असून त्याची अधिक वैधता आहे. जिओच्या या सर्व योजनांबद्दल जाणून घेऊ या…
९८ रुपयांचा प्लॅन
जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 98 रुपये आहे. हा रिचार्ज पॅक 14 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो, यानुसार युजर्सला प्लॅनमध्ये 21 जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जाते.
१२९ रुपयांचा पॅक
जिओचा हा प्लॅन 100 रुपयांपेक्षा थोडा अधिक महाग आहे परंतु त्यासोबत मिळणारे फायदेही अधिक आहेत. जिओच्या या प्लॅनची किंमत 129 रुपये आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये एकूण 2 जीबी डेटा देण्यात आला आहे. या प्लनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल व्यतिरिक्त 300 एसएमएस देखील दिले जातात.
१४९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा हा प्लॅन 150 रुपयांच्या अंतर्गत सर्वोत्तम प्लॅन आहे. 149 रुपयांच्या पॅकमध्ये 24 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहक दररोज 1 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. या प्लॅनची वैधता 24 दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. जिओचा हा रिचार्ज पॅक जिओ अॅप्सच्या मोफत सबस्क्रिप्शनसह देण्यात येतो.