इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात मोबाईलचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याने टेलिकॉम कंपन्यांना मोठा फायदा होत आहे, कारण मोबाईल वापरकर्ता ग्राहक त्यांचे वेगवेगळे प्लॅन घेत असतात, त्यातच देशातील रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या खासगी दूरसंचार कंपन्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या प्रीपेड योजनांच्या किमती वाढवल्या. याशिवाय या तिन्ही कंपन्यांनी अनेक रिचार्ज प्लॅन्समध्ये सुधारणा केली होती आणि त्यासोबत अनेक नवीन प्रीपेड प्लॅन्स सादर केले होते.
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओच्या एका प्लॅनबद्दल ग्राहकांनी जाणून घेणे आवश्यक आहे कारण तो एअरटेल आणि व्होडाफोन – आयडियाच्या तुलनेत तितकीच किंमत असूनही अधिक फायदे देतो. त्यामुळे यापासून मोबाईल ग्राहकांना ग्राहकांची आर्थिक बचत होऊ शकते.
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांचे 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, हाय स्पीड डेटा आणि इतर फायदे मिळत आहेत. एकाच किंमतीच्या या तीन प्लॅनच्या फायद्यांमध्ये काय फरक आहे आणि कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे हे जाणून घेऊ या….
एअरटेलचा 299 रुपयांचा रिचार्ज पॅक एका महिन्यासाठी ऑमेझॉन प्राइम मोबाइल सबस्क्रिप्शन, 1.5GB दैनिक डेटा, दररोज 100 SMS आणि 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलसह येतो. या पॅकमध्ये Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, तीन महिन्यांचे अपोलो सबस्क्रिप्शन तसेच मोफत हॅलो टुन्सची ऑफर आहे.
व्होडाफोन-आयडियाचा 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, दररोज 100 SMS सुविधा आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. Vi मुव्ही आणि TV एन्टी करण्यासोबतच, या प्लॅनमध्ये कंपनीचे अन्य वैशिष्ट्य देखील मिळेल. यासोबतच या प्लानमध्ये दर महिन्याला 2GB बॅकअप डेटा देखील मिळेल.
Jio चा हा प्रीपेड प्लॅन 299 रुपयांचा आहे आणि यामध्ये कंपनी वापरकर्त्याला 28 दिवसांसाठी दररोज 2GB इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देते. तसेच दैनंदिन डेटा संपल्यास, इंटरनेट स्पीड 64Kbps इतका कमी होईल. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema सारख्या सर्व Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. सध्या हा प्लॅन घेतल्यास Jiomart वर 20 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.