रविवार, फेब्रुवारी 1, 2026
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रिलायन्स जिओ बनली देशातील सर्वात मोठी कंपनी; BSNLलाही टाकले मागे

ऑक्टोबर 19, 2022 | 2:55 pm
in राष्ट्रीय
0
Reliance Jio Ambani1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खाजगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने सरकारी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला मागे टाकून देशातील सर्वात मोठी फिक्स्ड लाइन सेवा प्रदाता बनली आहे. देशात दूरसंचार सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच एका खासगी कंपनीने वायरलाइन श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मंगळवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) जारी केलेल्या ग्राहक अहवालानुसार, जिओचे वायरलाइन ग्राहक ऑगस्टमध्ये 73.52 लाखांवर पोहोचले, तर बीएसएनएल चे ग्राहक 71.32 लाख होते. बीएसएनएल गेल्या 22 वर्षांपासून देशात वायरलाइन सेवा पुरवत आहे, तर जिओने तीन वर्षांपूर्वीच त्यांची वायरलाइन सेवा सुरू केली होती. यासह, ऑगस्टमध्ये देशातील वायरलाइन ग्राहकांची संख्या वाढून 2.59 कोटी झाली आहे, जी जुलैमध्ये 2.56 कोटी होती.

ट्रायच्या आकडेवारीनुसार, वायरलाइन सेवा वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत ही वाढ खाजगी क्षेत्राने केली आहे. जिओ ने 2.62 लाख नवीन ग्राहक जोडले, भारती एअरटेल 1.19 लाख, तर व्होडा आयडिया (Vi) आणि टाटा टेलीसर्व्हिसेस ने या कालावधीत अनुक्रमे 4,202 आणि 3,769 नवीन ग्राहक जोडले. याउलट, सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपन्यांनी – बीएसएनएल आणि एमटीएनएल – ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे 15,734 आणि 13,395 वायरलाइन ग्राहक गमावले.

अहवालानुसार, देशातील एकूण दूरसंचार ग्राहक संख्या ऑगस्टमध्ये किरकोळ वाढून 1175 दशलक्ष झाली आहे, जिओने आणखी नवीन ग्राहक जोडले आहेत. तसेच, शहरी केंद्रांपेक्षा ग्रामीण भागांची वाढ जास्त झाली. ट्राय च्या ऑगस्ट 2022 च्या ग्राहक अहवालात म्हटले आहे की, “भारतातील टेलिफोन ग्राहकांची संख्या जुलै 2022 अखेर 117.36 कोटींवरून ऑगस्ट 2022 अखेरीस 117.50 कोटी झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत त्यात 0.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या व्यतिरिक्त केवळ रिलायन्स जिओ (32.81 लाख) आणि भारती एअरटेल (3.26 लाख) यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये नवीन मोबाइल ग्राहक जोडले, तर कर्जबाजारी खासगी कंपनी Vi ने या महिन्यात 19.58 लाख मोबाइल ग्राहक गमावले. या कालावधीत बीएसएनएलने 5.67 लाख, एमटीएनएल 470 आणि रिलायन्स कम्युनिकेशनचे 32 ग्राहक गमावले.

Reliance Jio Overtake BSNL Telecom Sector

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विद्यूत पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून वायरमनला मारहाण करणा-या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011