पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे ज्ञान किंवा योजना आणत असतात. त्यातच जिओने तरी बाजी मारलेली दिसून येते. ग्राहकांच्या सोयीसुविधांचा विचार करून या कंपनीने सध्या एक आगळावेगळा प्लॅन आणला आहे. आपण जर घरबसल्या नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर एक मोठी संधी आहे. Reliance JioFiber कंपनीने वापरकर्त्यांसाठी एक उत्तम मनोरंजन बोनान्झा आणला आहे.
या अंतर्गत, कंपनी आपल्या पोस्टपेड प्लॅनद्वारे वापरकर्त्यांना अमर्यादित मनोरंजन देणार आहे. सदर प्लॅन हे 399 ते 3,999 रुपयांच्या दरम्यान आहेत. यापैकी काही प्लॅनमध्ये कंपनी Amazon Prime सोबत Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.
या लॉन्च केलेल्या प्लॅनमध्ये, ग्राहकाला दरमहा 100 रुपये आणि 200 रुपये अतिरिक्त देऊन 14 ओटीटी अॅप्समध्ये प्रवेश मिळेल. 22 एप्रिल रोजी थेट होणार्या या प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेटचा वेग 1000Mbps पर्यंत आहे. याच संपूर्ण तपशील जाणून घेऊ या…
399 रुपये व 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये पर्याय : सदर कंपनीचे हे प्लॅन पूर्वी फक्त बेसिक इंटरनेट प्लॅन होते. आता कंपनी वापरकर्त्यांना 200 रुपयांपर्यंत अतिरिक्त देऊन मनोरंजन देत आहे. आता या योजना वेगवेगळ्या पर्यायांसह येतात.
प्लॅनमध्ये यूजर्सना इंटरनेट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट प्लसचा पर्याय मिळतो. 399 रुपयांच्या बेसिक प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडने अमर्यादित हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये दरमहा 100 रुपये अधिक जोडल्यास प्लॅन मनोरंजनासाठी अपग्रेड केला जाईल आणि त्यात 6 OTT अॅप्स पाहायला मिळतील.
14 अॅप्सची ऑफर : 399 रुपयांच्या मासिक भाड्याने या प्लॅनमध्ये 200 रुपये प्रति महिना जोडल्यास Entertainment Plus लाभ मिळेल, ज्यामध्ये कंपनी 14 अॅप्स ऑफर करत आहे. हीच योजना 699 रुपयांच्या प्लॅनसाठी आहे. या प्लॅनमध्ये मिळणारा इंटरनेट स्पीड 100Mbps असेल.
Amazon Prime व Netflix : 999 ते रु. 3999 पर्यंतचे सर्व प्लॅन एंटरटेनमेंट प्लस श्रेणीतील आहेत, जे पूर्वी देखील येत असत. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150Mbps स्पीड आणि Amazon Prime मिळेल. त्याच वेळी, 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये, कंपनी 300Mbps च्या स्पीडसह Amazon Prime आणि Netflix Basic ऑफर करत आहे.
2499 रुपयांचा प्लॅन : Amazon Prime आणि Netflix Standard 500Mbps च्या स्पीडवर बघायला मिळतील. 3999 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी Amazon Prime आणि Netflix चे प्रीमियम सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 1000Mbps आहे.
मोफत इंटरनेट बॉक्स आणि सेट-टॉप बॉक्स : Disney प्लस Hotstar, Zee5, Discovery Plus, Eros Now, Sony Liv आणि Lionsgate हे देखील प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या 14 मोफत OTT अॅप्सपैकी आहेत. तसेच कंपनीच्या नवीन प्लॅन्सची खास गोष्ट म्हणजे नवीन प्लॅन वापरकर्त्यांना जिओ फायबर पोस्टपेड कनेक्शन निवडण्यासाठी झिरो कॉस्ट इंटरनेट बॉक्स, सेट-टॉप बॉक्स आणि इन्स्टॉलेशन मोफत मिळते.