इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोबाईल धारक ग्राहकांसाठी वेगवेगळ्या टेलिकॉम कंपनी विविध प्रकारचे प्लॅन आणतात. त्यातच आता जिओने तीन प्लॅन आणले आहेत. वैधता आणि डेटानुसार रिलायन्स जिओचे वेगवेगळे प्लॅन आहेत. कंपनीने टॉप ट्रेंडिंग प्लॅन्सच्या यादीत काही प्लॅन देखील ठेवले आहेत. या यादीतून ग्राहकांसाठी Jio चे 3 लोकप्रिय प्रीपेड प्लॅन आणले आहेत. त्यांची किंमत 299 रुपयांपासून सुरू होते आणि शेवटच्या प्लॅनमध्ये ग्राहकांला 168 जीबी डेटा दिला जाईल.
299 रुपयांचा प्लॅन
ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी योजना आहे. रिलायन्स जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जाते. यामध्ये दररोज 2 GB डेटा मिळतो. अशा प्रकारे एकूण डेटा 56 GB होतो. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. ग्राहकांना Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.
666 रुपयांचा प्लॅन
जिओने याला ट्रेंडिंग प्लानच्या यादीत स्थान दिले आहे. याची वैधता 84 दिवसांची आहे आणि दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 126 GB होतो. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. ग्राहकांना Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.
719 रुपयांचा प्लॅन
जिओचा हा सर्वोत्तम मूल्याचा प्लॅन आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण डेटा 168 GB होईल. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. ग्राहकांना Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.