इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आता लवकरच आयपीएल सुरू होणार आहे. त्यामुळे सगळे ते पाहण्याच्या तयारीत आहेत. आणि सगळ्या कंपन्या आपल्याकडे प्रेक्षक खेचण्यासाठी तयारीला लागल्या आहेत. आतापर्यंत कमी पैशात अनेक सुविधा देणाऱ्या जिओने देखील आपले नवीन प्लॅन्स आणले आहेत. जिओचे हे प्लॅन्स आधीच लाँच झाले आहेत.
लवकरच आयपीएल २०२३ सुरू होणार आहे. ३१ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. क्रिकेटरसिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असणाऱ्या जिओने आपल्या युजर्ससाठी ३ जबरदस्त क्रिकेट प्लॅन लॉन्च केले आहेत. प्रेक्षकांना आयपीएलचा आनंद घेता यावा, म्हणून हे प्लॅन्स आणण्यात आले आहेत. जिओने लॉन्च केलेल्या या नवीन प्लॅनमध्ये युझर्सना दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅन्सव्यतिरिक्त, क्रिकेट अॅड-ऑनद्वारे १५० जीबी पर्यंत डेटा मिळवू शकतात.
९९९ रुपयांचा प्लॅन
कोणत्याही अडचणीशिवाय आयपीएलच्या संपूर्ण सीझनचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जिओचा ९९९ रुपयांचा क्रिकेट प्लॅन घेऊ शकता. हा प्लॅन ८४ दिवस वैध आहे. विशेष म्हणजे दररोज ३जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. या प्लॅनमध्ये २४१ रुपयांचे मोफत व्हाउचर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ४० जीबी डेटा मिळू शकतो.
३९९ रुपयांमध्ये २८ दिवसांचा प्लॅन
३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा देखील चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. यातही दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. तर या प्लॅनसह ग्राहकांना ६१ रुपयांचे मोफत व्हाउचर मिळणार आहे. ज्यामध्ये ६ जीबी मिळणार आहे. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग देखील करता येणार आहे.
२१९ रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन
२१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. जीओचा ३ जीबी डेटा मिळणारा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. मात्र या प्लॅनची वैधता खूपच कमी आहे. यामध्ये तुम्हाला फक्त १४ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनसह युझर २५ रुपयांच्या मोफत व्हाऊचरच्या मदतीने २ जीबी मोफत डेटा मिळवू शकतात.
जिओ डेटा अॅड ऑन प्लान
या तीन प्लॅन व्यतिरिक्त जिओने क्रिकेट अॅड ऑन डेटा प्लॅन देखील लॉन्च केले आहेत. यामध्ये तुम्हाला २२२ रुपयांमध्ये ५० जीबी डेटा, ४४४ रुपयांमध्ये १०० जीबी डेटा व ६६७ रुपयांमध्ये १५० जीबी डेटा मिळणार आहे.
Reliance Jio Cricket Recharge Plans for IPL