नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिओ बीपी आणि झोमॅटो यांच्यात बुधवारी स्वाक्षरी झालेल्या करारानुसार, जिओ बीपी, झोमॅटो च्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी गतिशीलता सेवा प्रदान करेल. तसेच, झोमॅटो इलेक्ट्रिक वाहने ‘जिओ बीपी पल्स’ ब्रँडेड बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचा लाभ घेण्यास सक्षम असतील. झोमॅटो ने 2030 पर्यंत 100% इलेक्ट्रिक डिलिव्हरी वाहनांचे लक्ष्य ठेवले आहे.
रिलायन्स आणि बीपीच्या सामर्थ्याचा फायदा घेत, जिओ-बीपी एक इको-सिस्टम तयार करत आहे ज्याचा EV मूल्य शृंखलातील सर्व भागधारकांना फायदा होईल. गेल्या वर्षी, जिओ बीपी ने भारतातील सर्वात मोठ्या EV चार्जिंग हबपैकी दोन लॉन्च केले. कंपनीचा इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यवसाय, भारतीय ग्राहकांना चार्जिंगची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा, ‘जिओ बीपी पल्स’ या ब्रँड अंतर्गत कार्यरत आहे. जिओ-बीपी पल्स मोबाईल अॅपवर ग्राहकांना जवळपासची चार्जिंग स्टेशन्स सहज सापडतील.
उच्च-कार्यक्षमता असलेल्या बॅटरी, वाहनांची उत्तम ऑन-रोड रेंज आणि काही मिनिटांत बॅटरी बदलण्याची सोय यामुळे दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी EVs हा उत्तम पर्याय आहे. विशेषतः डिलिव्हरी सेगमेंटला याचा फायदा होत आहे.