नागपूर – सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन आणत आहेत. या स्पर्धेत जिओ बाजी मारताना दिसून येत आहे. रिलायन्स जिओकडे अनेक नवीन रिचार्ज प्लॅन आहेत. यात ते ग्राहकांना दररोज 1GB ते 3GB पर्यंत डेटा देतात. या व्यतिरिक्त, जिओकडे व्हॅल्यू प्लॅन (मूल्य योजना) देखील आहे.
व्हॅल्यू प्लॅनमध्ये मर्यादित डेटा दिला जातो तरीही तो किमतीनुसार किफायतशीर असतो. Jio च्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1GB, 2GB आणि 3GB डेटा मिळतो. या योजनेची प्रतिदिन किंमत सर्वात कमी आहे. मात्र, यात डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन देणाऱ्या योजना वगळल्या आहेत.
रोज 1GB डेटा
रिलायन्स जिओचा फक्त हा असा एकच रिचार्ज प्लॅन असा आहे की, तो दररोज 1GB डेटा ऑफर करतो. विशेष म्हणजे हा प्लॅन 149 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवसाची किंमत 6.2 रुपये असून प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा उपलब्ध आहे. कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळण्यासोबतच दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच यात Jio अॅप्सची सदस्यता विनामूल्य उपलब्ध आहे.
रोज 2GB डेटा
रिलायन्स जिओकडे असे 4 प्लॅन आहेत, यात दररोज 2GB डेटा दिला जातो. तसेच ते डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन शिवाय देण्यात येतात. हे 4 प्लॅन 249 रुपये, 444 रुपये, 599 रुपये आणि 2,399 रुपयांचे आहेत. त्यापैकी 2,399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वात किफायतशीर आहे. या प्लॅनची रोजची किंमत 6.57 रुपये आहे. प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा उपलब्ध आहे. कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगसह, प्लॅन दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. तसेच, जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
रोज 3GB डेटा
रिलायन्स जिओकडे अशा 3 योजना आहेत, यामध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो आणि ते डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शनशिवाय येतात. हे प्लान 349, 999 आणि 3,499 रुपयांचे आहेत. प्रत्येक दिवसाच्या किंमतीनुसार, त्यापैकी सर्वात स्वस्त प्लान 3,499 रुपये आहे. 3,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोजचा खर्च 9.5 रुपये असेल. प्लॅनमध्ये एकूण 1095GB डेटा उपलब्ध आहे. तसेच कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा आहे. तसेच, Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.