मुंबई – रियालन्स जिओने आपल्या सर्वात स्वस्त प्लॅनचे अनावरण केले आहे. हा प्लॅन फक्त १ रुपयाच्या किमतीत सादर करण्यात आला आहे. हा प्लॅन विशेषतः माय जिओ अॅपवर लिस्ट करण्यात आला आहे. वेब सर्चवर हा प्लॅन दिसणार नाही. जिओने एक रुपयाचा हा प्लॅन विशेषतः कमी डेटा वापरणार्या ग्राहकांसाठी सादर केला आहे,
या प्लॅनचे फायदे
जिओच्या एक रुपयाच्या प्लॅनच्या फायद्याबाबत बोललो, तर या प्लॅनमध्ये एकूण ३० दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना १०० एमबी हायस्पीड डेटा ऑफर केला जात आहे. या प्लॅनची १०० एमबीची मर्यादा संपेल तर इंटरनेट स्पीट घटून ६० केबीपीएस होईल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा देण्यात आलेली नाही. हा प्लॅन कोणत्याही सिममध्ये अॅक्टिव्हेट करण्यासाठी खूपच उपयोगी साध्य होईल.
देशातील सर्वात स्वस्त प्लॅन
सध्याच्या परिस्थितीत एक रुपयाचा प्लॅन भारतातील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन झाला आहे. जिओशिवाय व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएलकडून एक रुपयाचा रिचार्ज प्लॅन दिला जात आहे.
प्लॅनची गरज काय?
भारतात गरिब नागरिकांची मोठी लोकसंख्या आहे. त्यांचा इंटरनेटचा वापर खूपच मर्यादित आहे. अशा गरजू ग्राहकांसाठी जिओकडून एक रुपयाच्या किमतीचा डेटा प्लॅन सादर करण्यात आला आहे. जिओतर्फे एक रुपयाच्या प्लॅनशिवाय १० आणि २० रुपयांमध्ये टॉप-अप प्लॅन मिळतात. १० रुपयांच्या प्लॅनमध्ये ७.४७ रुपयांचा टॉक टाइम मिळतो. तर २० रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॅलिडिटीसह १४.९५ रुपयांचा टॉकटाइम मिळतो आहे.