इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स ज्वेल्स या भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ज्युलरी रिटेलर ब्रँडने बिग बँगल फेस्ट सादर करत असल्याची घोषणा केली आहे. आगामी लग्नसराईचा काळ आणि सणासुदींच्या दिवसांसाठी ही अगदी योग्य ऑफर आहे. ग्राहकांना या मर्यादित कालावधी साठीच्या सणासुदींच्या ऑफरचा लाभ घेता येईल. यात सोन्याच्या बांगड्यांच्या घडणावळीवर ५० टक्के तर हिऱ्यांच्या बांगड्यांच्या घडणावळीवर ३५ टक्के (यात हिऱ्यांचे मूल्य आणि घडणावळ असा दोहोंचा समावेश आहे) सूट आहे. ७ जुलै २०२५ पर्यंत भारतभरातील सर्व रिलायन्स ज्वेल्स स्टोअर्स आणि ऑनलाइन (https://www.reliancejewels.com/) वर बांगड्यांच्या खरेदीवर ही आकर्षक ऑफर उपलब्ध आहे.
लग्नसराई, रक्षाबंधनची भेट आणि सणासुदीसाठीची खरेदी यासाठी ग्राहक सज्ज होत असताना देशभरात या सवलतीच्या माध्यमातून बांगडी हा दागिना परंपरा आणि स्टाईल यांचा पिढयानपिढ्या जपत असलेला सुंदर वारसा साजरा केला जात आहे. भारतीय दागिन्यांमध्ये अविभाज्य मानल्या जाणाऱ्या बांगड्या सर्व वयोगट, प्रसंग आणि वैयक्तिक स्टाईलला साजेशा असतात.
बिग बँगल फेस्टमधून खोलवर रुजलेल्या भावनिक बंधांना जपले जात आहे. त्याचसोबत यामुळे ग्राहकांना सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधीही मिळत असल्याने सणांसाठीची ही खरेदी अधिक अर्थपूर्ण आणि सुयोग्य आर्थिक निर्णय ठरेल. या महोत्सवात सोने आणि हिऱ्यांच्या पारंपरिक बांगड्या, स्टेटमेंट कडा, सुंदर कंगन असे बांगड्यांचे बहूविध आणि व्यापक प्रकार उपलब्ध असतील.
प्रत्येक सोहळा आणि महत्त्वाच्या क्षणांना एक सुयोग्य फिनिशिंग टच मिळेल याची शाश्वती देत रिलायन्स ज्वेल्स ग्राहकांना बिग बँगल फेस्टसाठी आमंत्रित करत आहे.