इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
व्हॅलेंटाईनच्या या ऋतूमध्ये प्रेमाचा बहर असताना, भारतातल्या सर्वात विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँड्सपैकी एक, रिलायन्स ज्वेल्स, प्रेम व्यक्त करण्यासाठीचे सर्वात शाश्वत रूप सादर करत आहे. या ब्रँडने त्याचे सुंदर अतिशय खास असे हि-यांच्या दागिन्यांचे व्हॅलेंटाईन कलेक्शन सादर केले आहे, ज्यामध्ये दैनंदिन वापरासाठीचे मोहक कानातील इअरिंग्ज, नाजूक हार, आणि सुंदर अंगठ्या यांचा समावेश आहे. हे कलेक्शन ट्रेंड्सच्या पलीकडे जाणारे चिरंतन प्रेमाचे प्रतीक आहे. भेट देणं अधिक खास करण्यासाठी, रिलायन्स ज्वेल्स हिर्याच्या दागिन्यांवर ३० टक्के पर्यंत सूट देत आहेत, जी १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्व रिलायन्स ज्वेल्स शोरूम्समध्ये उपलब्ध आहे.
रिलायन्स ज्वेल्समध्ये हि-यांचे विविध दागिने प्रत्येक प्रसंगासाठी डिझाइन केलेले आहेत – मग तुम्ही प्रेम, वचनबद्धता किंवा अविस्मरणीय क्षणांचा उत्सव साजरा करत असलात तरी. प्रत्येक दागिना, नाजूक स्टडपासून ते ठसठ्शीत हारापर्यंत, विचारपूर्वक तयार केला गेला आहे, ज्यामुळे तो व्हॅलेंटाईन डे साठीची आणि त्यानंतरही एक परिपूर्ण निवड बनतो.
आजच्या वेगवान डिजिटल जगात, जिथे निवड करतानाही सोय महत्वाची ठरते, तरीही दागिना हा नेहमीच जपून ठेवण्याच्या आठवणींचे प्रतीक ठरतो. या व्हॅलेंटाईनच्या मोसमात, रिलायन्स ज्वेल्स ग्राहकांना क्षणिक ट्रेंडच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, प्रेमाच्या भेटवस्तू स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करतात – जिवलगांच्या बाबतीत आपल्या भावनांशी साम्य असणारी अशी ही भावना आहे.
रिलायन्स ज्वेल्सचे सीईओ सुनील नायक विचारपूर्वक देण्याच्या भेटवस्तूंच्या महत्त्वावर प्रकाश टाकतात: “वेगाने आणि भावनेच्या भरात खरेदीच्या युगात, खरोखरच अर्थपूर्ण अशा भेटवस्तूंचे महत्व अजोड आहे. दागिने म्हणजे, फक्त आपलंसं करणं नाही तर त्यांच्या चिरंतन आकर्षणासह, ती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवड्लेली अभिव्यक्ती आहे. या व्हॅलेंटाईन डे ला, आम्ही आमच्या ग्राहकांना थोडं थांबून, विचार करून, आणि त्यांच्या नात्यासारखेच मौल्यवान आणि चिरंतन असं काहीतरी भेट देण्यासाठी प्रोत्साहित करतो.”
या ऋतूमध्ये, रिलायन्स ज्वेल्स ग्राहकांना पारंपरिक भेटवस्तूंपेक्षा वेगळा विचार करत, त्या विचारांची सुंदरता भेटीद्वारे साकार करण्यासाठी आमंत्रित करतात. जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंबित करणारा सुरेख दागिना निवडणे असो किंवा सोबतीच्या प्रवासाचे प्रतीक, खरेदीदार रिलायन्स ज्वेल्सच्या खास कलेक्शनमधून त्यांच्या प्रेमाचे परिपूर्ण रूप शोधू शकतात. १५०+ शोरूम्समध्ये १००+ शहरांमध्ये, रिलायन्स ज्वेल्स प्रेमाचा हा सुरेख सोहळा सोपा करते, तुम्ही कुठेही असलात तरी.