इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आता मुलांमध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या वाटायला सुरुवात केली आहे. मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्याकडे रिलायन्स जिओची धुरा सोपवल्यानंतर आता मुलगी ईशाही रिटेल व्यवसायाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. ईशा यांचे शिक्षण आणि अन्य बाबींबाबत आपण आता जाणून घेणार आहोत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत. ज्यामध्ये आकाश आणि ईशा ही जुळी भावंडे आहेत. तर अनंत अंबानी सर्वात लहान आहेत. ईशा पहिल्यांदा प्रकाशझोतात आली जेव्हा ती वयाच्या १६ वर्षांती होती. आणि ती जगातील सर्वात तरुण अब्जाधीश वारसांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होती.
३० वर्षीय ईशा अंबानीने येल विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा हिने येथे मानसशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आहे. इशा अंबानीने अमेरिकेतील मॅकिन्से अँड कंपनीतही काम केले आहे.
सध्या ईशा ही अंबानी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे मार्केटिंग काम पाहते. २०१६ मध्ये फॅशन पोर्टल अजियो लाँच करण्याचे श्रेय तिला जाते. वडील मुकेश अंबानी यांनी एकदा सांगितले की, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लॉन्च करण्यामागील प्रेरणा ईशा अंबानी होती. भाऊ आकाश अंबानी याला ब्रँडिंग आणि ग्राहकांच्या निर्णयांमध्ये ईशाने मोठी मदत केली.
ईशाने आनंद पिरामलसोबत लग्न केले आहे. आनंद पिरामल यांच्या वडिलांचे नाव अजय पिरामल असून ते पिरामल ग्रुपचे प्रमुख आहेत. आनंद पिरामल-ईशा अंबानी यांचा विवाह डिसेंबर २०१८ मध्ये झाला होता.
Reliance industries Isha Ambani new inning