मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबानी कुटुंबातील नवीन पिढीकडे रिलायन्स उद्योग समुहाची धुरा देण्यात आली आहे. अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. तर, ईशा, आकाश आणि अनंत रिलायन्सच्या संचालक मंडळावर घेण्यात आले आहे. मुकेश अंबानी पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहणार आहेत.
आकाश, ईशा आणि अनंत यांना मार्गदर्शनात प्राधान्य – मुकेश अंबानी अंबानी कुटुंबाच्या पुढच्या पिढीतील ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी नीता अंबानी यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयाला रिलायन्सच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली. मुकेश अंबानी पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत राहतील.
बोर्डाच्या फेरबदलाबाबत मुकेश अंबानी म्हणाले, “बोर्डाच्या बैठकीत ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळावर समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मी अभिमानाने सांगू शकतो की त्यांनी समर्पण, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमातून हे यश मिळवले आहे. इतर संचालकांसोबत ते रिलायन्स समूहाला नेतृत्व देण्यासाठी आणि आमच्या सर्व व्यवसायांना मार्गदर्शन करण्यासाठी एक संघ म्हणून काम करतील.”
दुसरीकडे नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील आणि या भूमिकेत त्या बोर्डाच्या कायम निमंत्रित म्हणून बोर्डाच्या सर्व बैठकांना उपस्थित राहतील. आपल्यासाठी निश्चित केलेल्या जबाबदाऱ्यांचा संदर्भ देत मुकेश अंबानी म्हणाले की, ते रिलायन्सच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व करतील. विशेषत: आकाश, ईशा आणि अनंत यांचे मार्गदर्शन त्यांच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहे. जेणेकरून ते सामूहिक नेतृत्व देऊ शकतील आणि येत्या दशकात रिलायन्सला वाढीच्या नव्या उंचीवर नेऊ शकतील.
Reliance Industries Ambani Family Next Generation
Jio AGM Isha Mukesh Neeta Anant Akash