इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचे झालेले मृत्यू अत्यंत दु:खदायक आहेत. रिलायन्स परिवार या घटनेबद्दल शोक व्यक्त करतो. पीडित कुटुंबांप्रती आम्ही आमची संवेदना मनापासून व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व व्यक्तींना लवकर आणि पूर्णपणे बरे वाटावे, हीच आमची प्रार्थना असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश डी. अंबानी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मुंबईस्थित आमचे रिलायन्स फाउंडेशन सर एच. एन. रुग्णालय सर्व जखमींचे उपचार विनामूल्य करेल. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. त्याला कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही व्यक्तीकडून पाठिंबा दिला जाऊ नये. दहशतवादाच्या या संकटाविरुद्धच्या निर्णायक लढ्यात आम्ही पंतप्रधान, भारत सरकार आणि संपूर्ण देशासोबत खंबीरपणे उभे आहोत.”