मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (RBL) ने प्रसिद्ध फूड चेन ब्रँड ‘ प्रेट ए मोंजेएर’ सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये ‘प्रेट ए मोंजेएर’ ब्रँड मजबूत करण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र काम करतील. प्रेट ए मोंजेएर हे ताजे अन्न आणि सेंद्रिय कॉफीसाठी जगप्रसिद्ध आहे. या फ्रँचायझी भागीदारीमुळे, रिलायन्स ब्रँड्स आता देशभरातील प्रमुख शहरांमध्ये फूड चेन उघडतील.
प्रेट ए मोंजेएरचे पहिले फूड शॉप 1986 मध्ये लंडनमध्ये उघडले गेले. जिथे हाताने तयार केलेले ताजे रेडी टू इट जेवण दिले जात होते. ब्रँडची सध्या यूके, यूएस, युरोप आणि आशियासह 9 देशांमध्ये 550 खाद्य दुकाने आहेत. दुसरीकडे, रिलायन्स ब्रँड्स, भारतातील सर्वात मोठी लक्झरी आणि प्रीमियम रिटेलर म्हणून ओळखली जाते. गेल्या 14 वर्षांत कंपनीने जगभरात ब्रँड विकसित केले आहेत.
दर्शन मेहता, एम डी. रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (आरबीएल) म्हणाले, “प्रेट सोबतची आमची भागीदारी भारतातील अन्न आणि पेय उद्योगाच्या मजबूत वाढीच्या संभाव्यतेवर आधारित आहे. आरबीएल भारतीय ग्राहकांच्या नाडीवर बारकाईने लक्ष ठेवते. अन्नाबाबत ग्राहकांची जागरूकता वाढली आहे –तसेच तयार -खाण्यासाठी अन्न ही नवीन फॅशन बनत आहे. जगभरातील भारतीयांना जसे ताजे आणि सेंद्रिय पदार्थांनी बनवलेले अन्न अनुभवायचे आहे, तसेच प्रेट त्यांची मागणी चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकणार आहे”
प्रेट ए मोंजेएरचे सीईओ पॅनो क्रिस्टो यांनी सांगितले: “दोन दशकांपूर्वी, आम्ही आशियातील प्रेटचे पहिले स्टोअर उघडले आणि आमचे ताजे अन्न आणि 100% सेंद्रिय कॉफी संपूर्ण खंडातील नवीन शहरांमध्ये नेण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली. आरबीएल आपल्या कौशल्याने आमच्या ब्रँडला भारतात यशस्वी होण्यास मदत करेल. आजपर्यंतची आमची सर्वात महत्वाकांक्षी जागतिक फ्रँचायझी भागीदारी असून त्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”
reliance-brand-big-global-company-agreement deal