मंगळवार, नोव्हेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स फाउंडेशन, वनतारा, रिलायन्स रिटेल आणि जिओकडून मदतीचा हात

सप्टेंबर 11, 2025 | 9:47 am
in संमिश्र वार्ता
0
reliance retail

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंजाबमध्ये आलेल्या विध्वंसक पुरातून दिलासा मिळावा यासाठी रिलायन्स गेल्या अनेक दिवसांपासून राज्य प्रशासन, पंचायत संस्था आणि स्थानिक स्वयंसेवी संघटनांसोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. विशेषतः अमृतसर आणि सुलतानपूर लोधी या अतिपूरग्रस्त भागांत तत्काळ मदत पोहोचवली जात आहे. कंपनीने पोषण, निवारा, सार्वजनिक आरोग्य आणि पशुधन या स्तरांवर दहा सूत्री मदतकार्य सुरू केले आहे.

जमिनीवर रिलायन्स अनेक प्रकारची मदत पुरवत आहे. पुरग्रस्तांना पोषण मिळावे यासाठी १० हजारांहून अधिक कुटुंबांना अन्नधान्याचे किट्स दिले जात आहेत. महिला किंवा ज्येष्ठ नागरिक हे घरप्रमुख असलेल्या १ हजार कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे व्हाउचर दिले जात आहेत. सामुदायिक स्वयंपाकासाठी धान्यसाठा आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी पोर्टेबल वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विस्थापित कुटुंबांसाठी ताडपत्री, ग्राउंडशीट, मच्छरदाणी, दोऱ्या आणि बिछाने यांसारखी अत्यावश्यक साहित्ये वितरित करण्यात आली आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी म्हणाले, “या दुःखाच्या क्षणी आमच्या संवेदना पंजाबमधील लोकांसोबत आहेत. अनेकांनी आपली घरे आणि उपजीविका गमावली आहेत. पूर्ण रिलायन्स परिवार पंजाबच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. लोकांसोबत जनावरांसाठी देखील अन्न, पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. आमची दहा सूत्री मदतयोजना सुरू असून या कठीण काळात आम्ही प्रत्येक पावलावर पंजाबसोबत आहोत.”

पूराच्या काळात व त्यानंतर साथरोग पसरू नयेत यासाठीही रिलायन्स काळजी घेत आहे. जलस्रोत निर्जंतुक करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक प्रभावित कुटुंबाला स्वच्छता संबंधी वस्तूंनी युक्त किट दिले जात आहे. ज्या जनावरांना त्वरित उपचाराची गरज आहे त्यांना तत्काळ मदत पुरवली जात आहे. रिलायन्स फाउंडेशन, वनतारा आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांसाठी वैद्यकीय शिबिरं उभारण्यात येत आहेत. सुमारे ५ हजार जनावरांसाठी ३ हजार सायलेज बंडल्स वाटप करण्यात आले आहेत.

वनताराची ५० हून अधिक सदस्यांची तज्ज्ञ टीम आधुनिक बचाव उपकरणांसह कार्यरत आहे. वाचवलेल्या जनावरांचे उपचार, मृत जनावरांचे सन्मानपूर्वक वैज्ञानिक दहन आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने रोगराईचा प्रसार रोखण्याचे काम ती करत आहे. रिलायन्सच्या टीम्स जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पंचायतांसोबत २४ तास कार्यरत आहेत.

जिओची पंजाब टीम, एनडीआरएफच्या पथकांसह समन्वयाने पुरग्रस्त भागांत नेटवर्क पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करत आहे. संपूर्ण राज्यात १००% कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी जिओचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. रिलायन्स रिटेलही २१ आवश्यक वस्तूंचा सुक्या धान्याचा किट तसेच स्वच्छतेसाठी किट्स पाठवत आहे. कंपनीने म्हटले आहे की, या संकटाच्या काळात आम्ही पंजाबच्या जनतेसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

Next Post

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत – पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत - पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011