इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (RCPL) महाकुंभमध्ये ‘कॅम्पा आश्रम’ उभारणार आहे. या विशेष विश्रांतीस्थळांमध्ये यात्रेकरूंना आराम करता येईल तसेच अल्पोपहारही घेता येईल. ‘कॅम्पा आश्रम’ अशा प्रकारे डिझाइन केले आहे की यात्रेकरूंना सुरक्षित आणि शांत वातावरण मिळेल. याशिवाय, रिलायन्सकडून कुंभ क्षेत्रात यात्रेकरूंच्या मदतीसाठी स्पष्ट आणि सहज वाचता येतील असे दिशादर्शक फलक आणि साईनेज लावले जात आहेत.
रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे सीईओ केतन मोदी म्हणाले, “महाकुंभ प्रयागराज २०२५ मध्ये आमची भागीदारी हा या भव्य अध्यात्मिक सोहळ्याच्या भावनेला सन्मान देण्याचा एक प्रयत्न आहे. एक कंपनी म्हणून आम्ही भारतीय परंपरांशी खोलवर जोडलेले आहोत. या पवित्र प्रसंगी समुदायाची सेवा करण्यामध्ये आम्हाला भारतीय उपभोक्त्यांच्या वारशाला नवे स्वरूप देण्याचा अभिमान वाटतो.”
महाकुंभचा शुभारंभ पौष पौर्णिमा स्नानाने झाला आहे. १३ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी देशभरातून आलेल्या भाविकांनी त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केले. १४ जानेवारी रोजी अमृत स्नान (शाही स्नान) होणार आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. रिलायन्सची ही योजना यात्रेकरूंना अधिक सोयीस्कर आणि संस्मरणीय अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.