इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत-मालदीव राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी विशेष टपाल तिकिटे जारी केली.
दोन्ही देशांमधील जुन्या द्विपक्षीय संबंधांचे प्रतिबिंब या टपाल तिकिटांवर दिसून येते. केरळमधील बेपोर येथील ऐतिहासिक गोदीमधील मोठे हस्तनिर्मित लाकडी जहाज उरू आणि मालदीवची पारंपरिक मासेमारी बोट – वधू धोनी यांचे या तिकिटावर चित्र आहे. या बोटी शतकानुशतकांपासून हिंदी महासागरातील व्यापाराचा भाग आहेत. मालदीवची पारंपरिक मासेमारी बोट – वधू धोनी – रीफ आणि किनारी मासेमारीसाठी वापरली जाते. मालदीवचा समृद्ध सागरी वारसा तसेच बेटावरील जीवन आणि महासागर यांच्यातील निकटचे बंध ती दर्शवते.
मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत एक होता. स्मारक टपाल तिकिटे जारी करणे हे दोन्ही देशांमधील घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.