पुणे – मोबाईलचा प्रचंड वापर वाढला असतानाच टेलिकॉम कंपन्यांनी मात्र आता ग्राहकांना जणू काही वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया पाठोपाठच रिलायन्स जीवोने देखील आपल्या अनेक प्लॅनमध्ये सुमारे 500 रुपयांनी वाढ केल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा भुर्दंड बसणार आहे.
रिलायन्स जिओने त्यांच्या काही निवडक प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली. जिओने आपल्या काही लोकप्रिय प्लॅनमध्ये 480 रुपयांपर्यंत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन किमती दि. 1 डिसेंबरपासून लागू होतील. आता कोणत्या प्लॅनवर ग्राहकांना आणखी किती खर्च करावा लागेल ते पाहू या…
75चा पॅक
1 डिसेंबरपासून ग्राहकांना 16 रुपये अधिक म्हणजेच 91 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या कालावधीत, ग्राहकांना एका महिन्यासाठी एकूण 3 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 50 एसएमएस मिळतील.
129चा पॅक
28 दिवसांची वैधता असलेला 129 रुपयांचा पॅक वाढल्यानंतर 155 रुपयांवर गेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि एकूण 300 एसएमएस मिळतील.
149चा पॅक
24 दिवसांच्या वैधतेचा 149 रुपयांचा पॅक आता 179 रुपयांचा झाला आहे. प्लॅनमध्ये, ग्राहकांना दररोज 1 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
199चा पॅक
28 दिवसांची वैधता असलेल्या 199 रुपयांच्या पॅकची किंमत आता 239 रुपये आहे. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना दररोज 1.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
249चा पॅक
28 दिवसांची वैधता असलेला 249 रुपयांचा पॅक वाढल्यानंतर 299 रुपयांवर गेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
399चा पॅक
56 दिवसांची वैधता असलेला 399 रुपयांचा पॅक वाढल्यानंतर 479 रुपयांवर गेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलसह दररोज 100 एसएमएस मिळतील.
444चा पॅक
56 दिवसांची वैधता असलेला 444 रुपयांचा पॅक वाढल्यानंतर 533 रुपयांवर गेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
329चा पॅक
84 दिवसांच्या वैधतेसह 329 रुपयांचा पॅक ग्राहकांना 1 डिसेंबरपासून 395 रुपये मिळतील. या प्लॅनमध्ये एकूण 6 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एकूण 1000 एसएमएस उपलब्ध असतील.
555चा पॅक
84 दिवसांची वैधता असलेला 555 रुपयांचा पॅक वाढल्यानंतर 719 रुपयांवर गेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
599चा पॅक
84 दिवसांची वैधता असलेला 599 रुपयांचा पॅक वाढल्यानंतर 719 रुपयांवर गेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
1299चा पॅक
84 दिवसांची वैधता असलेला 1299 रुपयांचा पॅक वाढल्यानंतर 1559 रुपयांवर पोहोचला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 24 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एकूण 3600 एसएमएस मिळतील.
या प्लॅनसाठी मोजा 480 रुपये अधिक
84 दिवसांची वैधता असलेला 2399 रुपयांचा पॅक वाढल्यानंतर 2879 रुपयांवर गेला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
छोटे प्लॅनही महाग
51 रुपयांचा प्लॅन, आता 61 रुपयांचा झाला आहे. यामध्ये 6 जीबी डेटा मिळणार आहे. तर
101 रुपयांचा प्लॅन, आता 121 रुपयांचा झाला आहे, यामध्ये मिळणार 12 जीबी डेटा आहे. तसेच 251 रुपयांचा प्लॅन आता 301 रुपयांचा झाला आहे, यामध्ये 50 जीबी डेटा असून 30 दिवसांची वैधता मिळेल.