नवी दिल्ली – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आणखी तीन वर्षांकरिता ही नियुक्ती असणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग कायदा १९९० (१९९० च्या २०) च्या कलम ३ अन्वये केंद्र सरकारने ही नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती ७ ऑगस्ट २०२१ पासून लागू होईल. त्यांची ही नियुक्ती, त्यांच्या वयाच्या ६५ वर्षांपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी होईल तो पर्येंत लागू राहणार आहे. याअगोदर रेखा शर्मा या ऑगस्ट २०१५ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य बनल्या आणि ७ ऑगस्ट २०१८ रोजी आयोगाच्या अध्यक्ष होण्यापूर्वी २९ सप्टेंबर २०१७ पासून त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष (प्रभारी) होत्या. .