इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची तर उपमुख्यमंत्रीपदी परवेश शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही नेते उद्या शपथ घेणार आहे. आपचा भाजपने दारुण पराभव केल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल यावर गेले काही दिवस अंदाज बांधले जात होते. आज अचानक भाजपने धक्का देत चर्चेत नसलेले नाव पुढे केले. तर चर्चेत असलेल्या नावाची उपमुख्यमंत्रीपदी निवड केली.
दिल्लीच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून विजेंद्र गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आपने १० वर्षे सत्ता असतांना बहुतांश काळ मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवालच होते. त्यानंतर अखेरच्या वर्षात महिलेला संधी देण्यात आली. भाजपने सत्ता येताच महिलेला पहिली संधी दिली.
रेखा गुप्ता या आरएसएसच्या सक्रिय सभासद असून शालीमार बाग विधानसभेच्या आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९ हजार ५९५ मतांनी पराभव केला. रेखा गुप्ता यांचा २०१५ व २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. यावेळी त्या निवडून आल्या.