नवी दिल्ली – कोरोना लशीसाठी तयार करण्यात आलेल्या कोविन पोर्टलमध्ये सुधारणार करण्यात येत आहे. या पोर्टलवर आता हिंदी आणि १४ प्रादेशिक भाषांमध्ये नोंदणी करता येणार आहे. तसा पर्याय अॅपवर देण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त इंग्रीज भाषेतच नोंदणी करता येत होती. कोरोनाबाबत निर्णय घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य संस्थेतर्फे सोमवारी ही माहिती देण्यात आली. येत्या आठवड्यात ही सुविधा सुरू होणार आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. इंग्रीज भाषा न येणार्यांना प्रादेशिक भाषा उपलब्ध करून दिल्यानंतर नोंदणी करणे सोपे होणार आहे. Cowin.gov.in पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षांवरील लोकांना अपॉइंटमेंट न घेता लसीकरण केंद्रांवर जाता येणार आहे.
नोंदणी कशी करावी
ब्राउझरवर सर्चमध्ये Cowin.gov.in टाइप करावे. किंवा https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकवर क्लिक करावे. Cowin पोर्टलवर सर्वात वर डाव्या बाजूला Register/ Sign In yourself लिहिलेले नजरेस पडेल. त्यावर क्लिक करावे. त्यानंतर मोबाईल नंबर टाइप करावा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा. तुमच्यासमोर नोंदणीचा अर्ज उघडेल. अर्जावर नाव, ओळखपत्रासह सर्व आवश्यक माहिती भरावी. लसीकरण केंद्रावर घेऊन जाण्यासाठी ओळखपत्रावरीलच माहिती भरावी.