नाशिक – जिल्ह्यातील बँन्ड पथक व त्यावर उपजिविका असणाऱ्या कलावंतांची माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नाशिक यांच्यामार्फत मुख्यालय स्तरावर मागविण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील नोंदणीकृत बँन्ड पथकांनी सदर माहिती त्वरीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) संजय आरणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, जिल्ह्यातील मातंग समाजाची नोंदणीकृत बँन्ड पथक व त्यावर अवलंबून असणारे वादक कलावंत यांच्यासाठी विशेष प्राध्यान्याने विविध कर्ज योजना राबविण्याचा महमंडळाचा मानस आहे.
कोरोना साथरोगाच्या प्रार्दूभावाने बँन्ड पथक व त्यावर अवलंबून असणारे घटक यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृती बँन्ड पथकांची माहिती संकलीत करून त्यांच्यासाठी विशेष अर्थसहाय्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) श्री. संजय आरणे यांनी कळविले आहे.