पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – Redmiने भारतात Redmi Watch 2 Lite हा नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस असून त्याची किंमत 4 हजार 999 रुपये आहे. Redmi Watch 2 Lite 1.55-इंच (320 x 360 pixels) TFT LCD स्क्रीनसह उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात 120+ पेक्षा जास्त वॉच फेसेस देण्यात आले आहेत. वजनाने अतिशय हलके असून केवळ 35 ग्रॅम वजनाचे हे स्मार्टवॉच आहे. विशेष म्हणजे पाण्याशी संपर्क आला तरीदेखील हे घड्याळ उत्तमरित्या काम करु शकते.
स्मार्टवॉचमध्ये 110पेक्षा जास्त फिटनेस मोड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 17 प्रोफेशनल मोडसह 110+ फिटनेस मोड आहेत. यात हृदयाची गती मोजली जाते. SpO2 मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंग आणि मासिक पाळीचे ट्रॅकिंग देखील करता येते. इतकेच काय तर, श्वासाच्या गतीचेही मोजमाप या स्मार्टवॉचमधून करता येते.
यात प्रभावी सेन्सर्स देण्यात आले असून, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, एक्सीलरोमीटर, इलेक्ट्रॉनिक कंपास आणि GPS/GLONASS/Galileo/Beidou यांचा समावेश आहे. यामध्ये बेस्ट म्युझिक कंट्रोल सिस्टीम, हवामानाचा अंदाज, नोटिफिकेशन्स, डू नॉट डिस्टर्ब, नोटिफिकेशन अलर्ट, इनकमिंग कॉल नोटिफिकेशन, अलार्म, टायमर आणि सर्च माय फोन यांसारखे उत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.
Redmi Watch 2 Lite ला 262mAh बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी 10 दिवसांपर्यंत आणि हेवी युझ मोडमध्ये 5 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. तर GPS सतत वापरत राहिल्यास, त्याची बॅटरी फक्त 14 तास चालेल. रेडमी वॉच 2 लाइट आयव्हरी, ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये मॅचिंग स्ट्रॅपसह उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचची किंमत 4 हजार 999 रुपये आहे. 15 मार्चपासून Amazon.in, Mi.com, Reliance Digital, Mi Home Stores वर हे स्मार्ट वॉच उपलब्ध होईल.