मुंबई – दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या दिवसात नव्या वस्तू खरेदी करण्याची आपली जुनी परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या वस्तूंवर ऑफर्स देत असतात. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन ही माणसाची गरज झाली आहे. हेच ओळखून स्मार्टफोन कंपन्यांकडून फेस्टिव्ह ऑफर्स दिल्या जात आहेत.
या दिवाळीला कमी बजेटमध्ये नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर रेडमी नोट ९ च्या स्मार्टफोनवर चांगली ऑफर मिळत आहे. एमआयने आपल्या रेडमी नोट ९ स्मार्टफफोनवर एमआय एक्सचेंज कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत जुने फोन एक्सचेंज करून ग्राहक रेडमी नोट ९ खरेदी करू शकणार आहेत. जर पूर्ण एक्सचेंज बोनसची रक्कम मिळाली, तर रेडमी नोट ९ हा स्मार्टफोन तुम्ही कमीत कमी १४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहात. रेडमी नोट ९ साठी कोणत्या ऑफर्स ठेवल्या आहेत हे जाणून घेऊयात.
तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
रेडमी नोट ९ च्या बेस मॉडेल म्हणजेच ४ जीबी+ ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे. तर ४ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आणि टॉप एंड ६ जीबी+ १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. या तिन्ही व्हेरिएंटवर कंपनीकडून १०,५०० रुपयांपर्यंत एमआय एक्सचेंज ऑफर सादर करण्यात आली आहे. म्हणजेच जुने फोन एक्सचेंज करून रेडमी नोट ९ वर १०,५०० रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑफर मिळत आहे. जुन्या फोनवर एक्सचेंजवर तुम्हाला पूर्ण १०,५०० रुपयांचा बोनस मिळत असेल तर रेडमी नोट ९ जा ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंट फक्त १,४९९ रुपये, ४ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट फक्त २,४९९ रुपये आणि ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटवर ३,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
एमआय एक्सचेंज सुविधा कशी घ्यावी?
१) सर्वप्रथम फोन खरेदी करण्यासाठी ‘Buy Now’ वर क्लिक करा.
२) तुमच्या आवडीचा व्हेरिएंट निवडा, स्क्रोल करा आणि ‘Buy With Exchange’ पर्यायावर क्लिक करा.
३) पिनकोडची माहिती नोंदवा.
४) जो फोन एक्सचेंज करायचा आहे तो मॉडेल सलेक्ट करावा.
५) IMEI ची संपूर्ण माहिती नोंदवा.
६) Agree and Apply Credit Now सलेक्ट करा आणि जुन्या फोनची चांगली किंमत जाणून घ्या.
७) खरेदी केल्यास डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह घरी येऊन जुना फोन कलेक्ट करून नवा फोन देऊन जाईल.