इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – Redmi कंपनीने Redmi 10A स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. फोनची विक्री सुरू झाली आहे. या फोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनची अधिक माहिती जाणून घेऊ या…
किंमत व ऑफर :
Redmi 10A स्मार्टफोन दोन प्रकारात येतो. त्याच्या 3 GB RAM + 32 GB वेरिएंटची किंमत 8,499 रुपये आणि 4 GB RAM + 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. Amazon व्यतिरिक्त, हा फोन mi.com आणि Mi Home द्वारे विकला जाईल. निळा, राखाडी आणि काळा या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
डिस्प्ले
स्मार्टफोनमध्ये 6.53-इंचाचा IPS डिस्प्ले आहे, जो 720×1600 पिक्सेल (HD+) रिझोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशोसह येतो. Redmi 10A 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत स्टोरेजसह ऑक्टा-कोर MediaTek Helio G25 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हे Android 11 आधारित MIUI 12.5 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.
कॅमेरा
यात सिंगल रियर कॅमेरा आणि सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट सेन्सर रियर कॅमेरा सेटअपमध्ये देखील दिसेल. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सदर कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 30 तासांपर्यंत कॉलिंगची सुविधा देते. फोनच्या रिटेल बॉक्समध्ये 10 W चा चार्जर मिळेल.