इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
पुनर्विकास इमारतीतील फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी
ग्राहक राजा तुला माहित आहे का जर आपण इमारत पुनर्विकास सोसायटीची जुनी इमारत विकसित करायला देऊन नवीन बांधकाम करून फ्लॅट ताब्यात घ्यायला जाताना आता आपणास परत स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही. हे अनेकांना माहित नाही. यासंदर्भात आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊ…
इमारत पुनर्विकास सोसायटीसंदर्भात सरकारने दोन आदेश काढले आहेत. ते म्हणजे
रजिस्ट्रार ऑफ स्टॅम्प यांनी या आधी खालील सर्क्युलर (जी आर)
१) ओ.न.15/व मुदत/गाईड लाईन/ 621 दिनांक २३/०६/२०१५
आणि
२)न.के.5/स्टॅम्प-17/प्र क्र.10/13/303/17 दिनांक ३०/०३/२०१७
जारी केले होते त्यात अशा पुनर्विकास फ्लॅटवर बाजार भावाप्रमाणे स्टॅम्प ड्युटी आपल्या नवीन विकसित फ्लॅट मध्ये राहायला जायच्या अगोदर द्यावी लागत होती. काही ठिकाणी ही रक्कम बिल्डर भारत होते तर काही ठिकाणी ग्राहक.
कारण सरकार डेव्हलपमेंट करारनामा नोंदवताना त्यावर रजिस्ट्रार स्टॅम्प ड्युटी घेत होते त्यातच परत सर्व सोसायटी सभासद चे वैयक्तिक करार नाम्यावर पण लाखो रुपये स्टॅम्पचे द्यावे लागत होते.
मुंबई हाय कोर्टाचे जस्टिस जी एस पटेल यांनी दिनांक* *१७/०२/२०२३ रोजी एक landmark निकाल दिला आहे.
(WRIT PETITION NO. 4575 OF 2022).
यामध्ये त्यांनी असा निर्णय दिला आहे की एकदा सोसायटीने डेव्हलपमेंट आग्रिमेन्ट (विकसन करारनामा) केला आणि त्यावर लागणारी स्टॅम्प ड्युटी भरली की प्रत्येक सभासदाने परत स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही. फक्त १०० रुपये चे स्टॅम्प पेपर वर सदर पर्मनंट अल्टर्नेट अकोमोडेशन आग्रिमेन्ट करावे आणि त्यांना त्यावर कोणतीही अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी भरायला लावू नये.
उदाहरण दाखल समजा एका सोसायटीत एक जुना फ्लॅट हा ५०० स्क्वेअर फूट आहे आणि डेव्हलपमेंट करारनाम्यात सोसायटी तील सर्व फ्लॅट धारकांना जर २५% इतकी वाढीव जागा बिल्डर ने देऊ केली म्हणजे ५०० स्क्वेअर फुटला १२५ स्क्वेअर फूट फ्री जागा देऊ केली तरीही त्यांना अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही.
फक्त जर एखाद्या सभासदाने सर्वांना मिळणाऱ्या वाढीव(काही टक्के) जागे व्यतिरिक्त आणखी जागा खरेदी केली तर त्या अतिरिक्त खरेदी जागेवरच फक्त स्टॅम्प भरावा लागेल. बिल्डर ने दिलेल्या फ्री जागेवर स्टॅम्प भरायची आवश्यकता नाही.
म्हणजेच जर ५०० स्क्वेअर फूट बदल्यात बिल्डर ने ६२५ स्क्वेअर फूट जागा दिली आणि सदर सभासदाने समजा ८०० स्क्वेअर फूट फ्लॅट घेतला तर त्या सभासदाला फक्त १७५ स्क्वेअर फूट जागेवर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल.
कोर्टाने निकाल पत्रात असेही नमूद केले आहे की हे सर्व फक्त याच केस साठी लागू नाही तर सर्वांसाठी लागू होईल.
कोर्टाने वरील रिट पीटिशन वर आदेश देताना महाराष्ट्र शासनाचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रार अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प यांची दोन परिपत्रके रद्द केली आहेत ज्यात अशी स्टॅम्प ड्युटी घ्यावी असे नमूद केले होते. सदर आदेशाने खालील परिपत्रके रद्द केली आहेत.
१) ओ.न.15/व मुदत/गाईड लाईन/ 621 दिनांक २३/०६/२०१५
आणि
२)न.के.5/स्टॅम्प-17/प्र क्र.10/13/303/17 दिनांक ३०/०३/२०१७.
ग्राहक राजा आता तू म्हणशील की यात ग्राहकाचा काय फायदा कारण आधी बऱ्याच केसेस मध्ये बिल्डरच स्टॅम्प ड्युटी भरत होता.
तर ग्राहक राजा हे समजून घे की जर या आदेशाने बिल्डर चा फायदा झाला आहे तर त्याचा काही फायदा ग्राहक म्हणून आपणा कडे पण वळला पाहिजे.
त्यामुळे आता आपण बिल्डर बरोबर जेव्हा री-डेव्हलपमेंट करारनामा करताल तेव्हा बिल्डर शी याबाबत बोलून घ्या आणि त्याचा फायदा आणखी मोफत जागा मिळणे साठी घ्या कारण साधारण अशी प्रॅक्टिस आहे की जुन्या इमारतीचे पुनर्विकास करताना बिल्डर डेव्हलपमेंट करारनामा ची स्टॅम्प ड्युटी भरतो तसेच आधी या वरील दोन परिपत्रक प्रमाणे सर्व सभासदांची स्वतंत्र स्टॅम्प ड्युटी पण भारत होते. त्यामुळे आता जे या केस मुळे बिल्डर चे पैसे वाचणार आहेत ते प्रत्येक फ्लॅट मागे काही लाखात असतील तेव्हा त्या बदल्यात आपल्याला अजून काही फायदा करून घ्यावा.
यासाठी आणि इतर सर्व ग्राहक मार्गदर्शन साठी आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आपल्या जिल्ह्यातील लोकांचे मार्गदर्शन घेऊ शकता. अगदी मोफत
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971
*देवगिरी परभणी* श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार* श्रीम.वंदना तोरवणे, मो .9156972786
Redevelopment Flat Stamp Duty Rule Act by Vijay Sagar