नवी दिल्ली – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. या महोत्सवानिमित्त लाल किल्ल्यावर अतिशय शानदार समारंभ होत आहे. या सोहळा ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्यावतीने विशेष अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. लाल किल्ल्यावरील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण या अॅपद्वारे पाहता येणार आहे. या अॅपवरील सोहळा पाहण्याचा खास अनुभव म्हणजे ३६० कोनातून घेण्यात आलेले व्हिडिओ पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.indianidc