मुंबई – भारतातील अग्रगण्य खाजगी रेडिओ आणि मनोरंजन नेटवर्क ९३. ५ रेड एफ एमतर्फे सुपरहिट मराठी फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे. मराठमोळा फिल्म फेस्टिव्हल हा मराठी सिनेमांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आला असून या फेस्टिव्हलची सुरुवात हे २५ आणि २६ मार्च २०२२ रोजी जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल , कॅम्प, पुणे येथे प्रदर्शित केले जातील.
रेड एफ एम पुण्याची आवडती आरजे – कल्लाकर श्रुती सोबत या फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे. या मराठी फिल्म फेस्टिव्हलचा मुख्य उद्देश हा प्रेक्षक आणि सेलिब्रिटींच्या सहभागातून मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देणे हा आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नवरा माझा नवसाचा, सैराट, धूम धडका आणि कट्यार काळजात घुसली यांसारखे जुने आणि नवे सुपरहिट मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत.
महेश कोठारे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर आणि इतर अनेक नामवंत मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी विनामूल्य असणार आहे. स्वारगेट येथील रेड एफ एमच्या पुणे कार्यालयात मोफत पास उपलब्ध आहेत. तसेच बुक माय शो अँपवर देखील मोफत तिकिटे बुक करू शकतात.