पुणे – पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी आहे. कारण भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रीय बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या विविध शाखांमध्ये परिवीक्षाधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण २०५६ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार आज दि. ५ ऑक्टोबर पासून अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ आहे. इच्छुक उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट, sbi.co.in ला भेट द्यावी आणि करिअर विभागात जावे. उमेदवार या विभागात दिलेल्या (SBI PO 2021 ) अधिसूचनेच्या लिंकवरून अधिसूचना डाउनलोड करू शकतात.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेअंतर्गतसाठी उमेदवारांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. नंतर वाटप केलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून, उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतील. अर्जादरम्यान, उमेदवारांना ७५० रुपये विहित अर्ज शुल्क भरावे लागेल, उमेदवार ते ऑनलाईनद्वारे भरू शकतील.
एसबीआयने जारी केलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर भर्ती अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच १ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेत शिथिलता दिली जाते.