विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्या लाटेचा भारतावर वाईट परिणाम झाला असून अनेक राज्यांमधील रुग्णालये आरोग्य कर्मचारी, लस, ऑक्सिजन, औषधे आणि बेडची कमतरता आहेत. त्या पार्श्वभूमीवर सैन्य वैद्यकीय सेवा आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर ४०० वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश सशस्त्र बल वैद्यकीय सेवा विभाग यांना देण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘टूर ऑफ ड्यूटी योजनेअंतर्गत ४०० माजी-एएमसी किंवा एसएससी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राट तत्त्वावर जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या वैद्यकीय अधिका्यांना निश्चित एकरकमी मासिक रक्कम दिली जाईल, जे सेवानिवृत्तीच्या वेळी घेतलेल्या वेतनातून मूलभूत पेन्शन वजा करून मोजले जाईल. तसेच त्यांना काही अतिरिक्त देय असेल आणि कराराच्या मुदती दरम्यान ही रक्कम कायम राहील. मात्र इतर कोणत्याही भत्ते दिले जाणार नाहीत.
सदर नियुक्तीसाठी वैद्यकीय अधिका-यांना नागरी निकषांनुसार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. कोविड -१९साथीच्या दुसर्या लाटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विशेषज्ञ आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांसह अतिरिक्त डॉक्टरांना विविध रुग्णालयात यापूर्वीच तैनात केले आहे. तसेच डॉक्टरांच्या सेवेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, त्यामध्ये आणखी २३८ डॉक्टरांची वाढ होणार आहे.